केंद्र शासनाच्या योजना जनहिताच्या – संदीप मेस्त्री
कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली तालुक्यातील वरवडे गावात भाजपच्या वतीने घर चलो अभियान राबवण्यात आले.केंद्र शासनाच्या योजना जनहिताच्या असल्याचे प्रतिक्रिया सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.
यावेळी वरवडे बूथ वरील हिवाळ वाडी, मुस्लिम वाडी येथील ग्रामस्थांशी भाजपा कार्यकर्त्यांनी संवाद साधला, केंद्र शासनाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणे ,गावातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत ग्रामसेवक, तलाठी , आशा सेविका व विविध योजना लाभार्थी संवाद कार्यक्रम आज पार पडला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष , कलमठ सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले केंद्र शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरीब कल्याणच्या असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ,आयुष्यमान भारत ह्या योजना सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या ठरल्या. यावेळी संदिप मेस्त्री व भाजपा पदाधिकारी यांनी विविध योजनांची माहिती उपस्थित महिला व घरोघरी जाऊन ग्रामस्थांना दिली. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून बूथ अध्यक्ष विजय कदम यांच्या समवेत महेश कदम, माजी उपसरपंच प्रमोद गावडे, ग्रामपंचायत सदस्य काका कदम, सोहेल खान, हसन खोत, रोहित बांदल, प्रेमवीर बांदल, संतोष कदम उपस्थित होते.