तरंदळे पटेलवाडी येथील सुप्रिया खरात बेपत्ता

कणकवली दि.८ फेब्रुवारी(भगवान लोके)

तरंदळे पटेलवाडी येथील सुप्रिया जानू खरात (५४) या बुधवारी ११.४५ वा. च्या सुमारास कपडे शिवण्यासाठी कणकवली येथे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या त्या परत आल्या नाहीत. त्यांचा शोध घेऊन ही त्या न सापडल्याने बेपत्ता असल्याची खबर त्यांचा नवरा जानू जनू खरात यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुप्रिया खरात यांनी घरातून निघताना नेसणीस पोपटी कलरची साडी, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कानातले, उंची साधारण पाच फूट, रंग गोरा अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.