मालवण,दि.८ फेब्रुवारी
मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या सन १९६९ – ७० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकतेच तळाशील येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी गप्पा गोष्टींसह जुन्या आठवणींना उजाळा दिला.
टोपीवाला हायस्कुलचे सन १९६९-७० मधील बॅचचे माजी विद्यार्थी दरवर्षी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येतात. यावर्षी हा स्नेहमेळावा तळाशील येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला. यात चंदू सामंत, दीपक भोगले, दिलीप सावजी, अशोक केणी, चारुदत्त पाटकर, अनिल झाट्ये, गुरुनाथ शिरोडकर, जगदीश सामंत, अरुण काळसेकर, श्रीराम सकपाळ, विलास सकपाळ, अपर्णा सामंत, हिराकांत पालव, विलास केणी, अरुण परब, हनुमंत मेथर, श्री. आरोलकर, श्रीमती झाट्ये, श्रीमती पाटकर आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.