विरोधी पक्ष नेते आंबासाहेब दानवे यांच्याकडे करणार मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक
देवगड,दि.८ फेब्रुवारी
देवगड तालुक्यातील आंबा कलम मोहरा वरती थ्रीप्स या कीटकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून या थ्रीप्स रोगामुळे यावर्षी आंबा उत्पादन चांगले होणार आंबा उत्पन्नात घट झाली आहे . जानेवारी महिन्यामध्ये आंबा कलमांना प्रचंड मोहोर आला या मोहरा वरती थ्रीप्स या रोगाने थैमान घातले असून मोहोर काळा पडून फळ गळ होत आहे तसेच फळ गळून पडण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात होत असून या रोगावर बाजारात व कृषी सेवा केंद्रांमध्ये रु ४००० ते ५००० प्रति लिटर रुपये किमतीची औषधे उपलब्ध आहेत मात्र महागडी औषधी वापरून या रोगावर नियंत्रण ठेवण्यात येत नसल्यामुळे प्रसंगी औषधे तयार करून स्थानिक पातळीवर विक्री होत असल्याचा आरोपही श्री नाईक यांनी केला.त्यामुळे येथील शेतकरी बागायतदार हतबल झाले आहे औषधांवर एवढा प्रचंड खर्च करून देखील हा रोग नियंत्रणामुळे येत नसेल तर सगळे औषध कंपन्या सदर औषधी बोगस स्वरूपाची विक्री करत असल्याचा संशय आंबा बागायतदार व्यक्त करीत असून या औषधांची कृषी विभागामार्फत तपासणी करून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबा बागायत दारा कडून होत आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे लेखी निवेदन शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात देण्यात येणार असल्याची माहिती युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या यावेळी देवगड तालुका युवा सेनाप्रमुख गणेश गावकर,फरीद काझी, शिवसेना उपतालुकाप्रमुख बुवा तारी उपस्थित होते. यापुढे बोलताना नाईक म्हणाले कृषी विभागाचे या बनावट औषध विक्री कडे नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे या विषयावर सिंधुदुर्ग युवा सेना आवाज उठवत असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते या नात्याने विधान परिषदेत व राज्य सरकारकडे याबाबत आवाज उठवून बोगस औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावेत त्याचबरोबर कृषी विभाग फळ संशोधन केंद्र मार्फत रोगाचे संशोधन करून त्यावर योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात व तसे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागाला देण्यात यावेत अशी मागणी ही या निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
त्याचबरोबर मनाई आदेश असताना जिल्ह्यात कोठेही निषेध अथवा पुतळा दहन झाले फक्त देवगड शहरात अशी घटना घडली व वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न झाले आहेत .त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत असून आम.भास्कर जाधव याना देवगडात येण्याची भाजप नेत्यांनी वेळ द्यावी ते निश्चितपणे देवगड येणार आणि आगामी काळात प्रचाराच्या निमित्ताने आणणार आहोत असेही सांगितले.