सावंतवाडी, दि. ९ फेब्रुवारी
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वेंगुर्ला कार्यकारिणीची बैठक उद्या शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आली आहे.
महिला अंनिस च्या जिल्हा संघटक श्रीमती रूपाली पाटील म्हणाल्या,आपल्या आजूबाजूला अनेक जण आपल्या श्रद्धेचा गैर फायदा घेऊन फसविताना आपण पाहतो,वाचतो आणि अचंबित होतो की शिकलेला माणूस एवढा फसतोच कसा ?आम्ही देव मानतो , आमची देवावर प्रचंड श्रद्धा आहे…परंतू या आमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन आम्हची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध आमचा लढा आहे .
या बाबतीत शास्त्रीय माहिती देण्यासाठी आणि या प्रवाहात सामिल होऊन वैज्ञानिक दृष्टीकोन आचरून जीवन समृद्ध करावे या साठी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेंगुर्ला कार्यकारणी निश्चित करावयाची ठरविले आहे.अंनिसच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या बंधू भगिनींनी शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता वेंगुर्ला येथील अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांच्या जनसेवा प्रतिष्ठान कार्यालयात एकत्र जमावे, असे आवाहन रुपाली पाटील, वेंगुर्ले तालुका संपर्क प्रमुख श्रीमती स्मिता गावडे यांनी केले आहे.