दोडामार्ग पोलिसांनी मध्यरात्री सापळा लावून घाटमाथ्यावर जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 दोन जणांना घेतले ताब्यात गोवा येथून चोरटी दारु वाहतूक होत असल्याचे उघड

पोलिस निरीक्षक सुरेश गावीत याना ताबा घेतल्यानंतर पहिली कारवाई दारु माफियांचे दाबे दणाणले

दोडामार्ग, दि. ९ फेब्रुवारी

गेल्या काही वर्षांपासून गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे दारु दोडामार्ग येथील अनेक चोर वाट्यांनी मुख्य रस्त्यावरुन घाटमाथ्यावर तसेच बेळगाव ,कोल्हापूर, चंदगड, तसेच इतर ठिकाणी नेली जाते. नानोडा गोवा, खोलपे गोवा तसेच इब्रामपूर गोवा या भागात दारु भरून दोडामार्ग हद्दीतून नेल्या जातात अशाच प्रकारे दारु भरलेला टेम्पो दोडामार्ग येथून जाणार याची पक्की खबर दोडामार्ग पोलिसांना मिळताच दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात सापळा लावून राञी मध्यरात्री सांगोला सोलापूर येथे दारु भरून जाणारा टेम्पो अडवून तपासणी केली असता गोवा बनावटीची जवळपास दहा लाखांची दारु टेम्पो असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी दिली. या कारवाई मुळे दारु माफियांचे धाबे दणाणले आहे. दोडामार्ग पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही पहिली कारवाई आहे.

दोडामार्ग पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी मध्यरात्री दिड वाजता ही कारवाई केली. पोलिस विठोबा सावंत, दिपक सुतार, होमगार्ड, ताटे, खुटवळकर, ताटे, यांनी दोडामार्ग गांधी पिंपळेश्वर चौकात ही कारवाई केली. दोन जणांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक जयेश ठाकूर अधिक तपास करत आहेत. संशयीत यांनी या अगोदर दारु वाहतूक केली. आहे काय यामागे आणखी कोण आहेत याचा तपास करत आहेत.