सावंतवाडी दि.९ फेब्रुवारी
सावंतवाडी येथे ५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सन २०२३-२४ दि.१० ते १४ फेब्रुवारी रोजी या कालावधीत होणार असून समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय घेऊन हे बालवैज्ञानिक प्रदर्शन होत आहे .जिमखाना मैदानावर या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा उद्या दि.१० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक सिंधुदुर्ग आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल भोसले नॉलेज सिटी चराठा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन होत आहे.
जिमखाना मैदानावर होणाऱ्या या संमेलना ची आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली.
या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा उद्या शनिवार दि.१० फेब्रुवारी सकाळी दहा वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत. याशिवाय खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिल तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त शिक्षण सुरज मांढरे, संचालक राहुल रेखावार, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे हे उपस्थित राहणार आहे.
५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन का बक्षीस वितरण सोहळा बुधवार दिन.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती संचालक कृष्णकुमार पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, संचालक राहुल रेखावार, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे ,संचालक डॉ. शोभा खंदारे, शिक्षण संचालक महेश पालकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेंद्र कांबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था संचालक डॉ. राधा शतकरी, अधिव्याख्याता प्रवीण राठोड, राजकुमार अवसरे, शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, वामन तर्फे व भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले शिक्षण पर्यवेक्षक राजू नेब, यशवंतराव भोसले स्कूलच्या मुख्याध्यापक श्रीमती प्रियंका देसाई सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Home आपलं सिंधुदुर्ग सावंतवाडी येथे ५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सन २०२३-२४ दि.१० ते...