१३ फेब्रुवारीला विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली दि.९ फेब्रुवारी (भगवान लोके)
श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे, उगवतीवाडी यांच्यावतीने माघी गणेश जयंती उत्सव २०२४ व श्री सत्यनारायणाची महापुजा दि.१३ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या निमित्ताने मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० वा. श्री गणेश पुजन , सकाळी १०.०० वा. सामुहिक अभिषेक, सकाळी १०.३० श्री सत्यनारायणाची महापुजा, सकाळी ११.३० वा.महाआरती , दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ४.०० वा.हळदीकुंकु समारंभ , सायं. ४.०० ते ७.०० वा. खेळ पैठणीचा, सायं. ७.०० ते ८.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ १०.०० वा. नंतर दिंडी भजन,संगीत भजन आणि स्थानिक वारकरी भजने होणार आहेत.
तरी या कार्यक्रमाचा सहकुंटुंब व मित्रमंडळीसह सहभागी होऊन तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे उगवतीवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.