देवगड,दि.९ फेब्रुवारी
दिशा ग्रंथालय जामसंडे यांस कडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जामसंडे कावलेवाडी प्रशालेस २५ पुस्तकांचा संच भेट दिली. वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी दिशा ग्रंथालयाने वाचनीय अशी पुस्तके दिली. यावेळी सन्मा. अर्चना आयरे (अध्यक्ष – दिशा ग्रंथालय) अनिल आयरे, हरिश्चंद्र यादव, अनिता आयरे, रितेश जामसंडेकर, गौरव तेली उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रियांका कुबल(मुख्याध्यापक – जामसंडे कावलेवाडी) यांनी केले. सूत्रसंचलन व आभार आनंद जाधव यांनी केले