कविवर्य आ.सो.शेवरे स्मृती चषक स्वरचित खुल्या काव्य लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ११ फेब्रुवारी रोजी

वैभववाडी,दि.९ फेब्रुवारी
सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कविवर्य आ.सो.शेवरे स्मृती चषक स्वरचित खुल्या काव्य लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (पश्चिम ) येथे आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत लेखिका प्रा. आशालता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजिनियर अनिल जाधव भूषवणार आहेत. तर सूत्रसंचालन स्नेहल तांबे करणार आहेत . या कार्यक्रमात काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्या कवींचा गुणगौरव आणि पारितोषिक वितरण होणार आहे.

या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने कवी प्रा. सिद्धार्थ गो. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलनही आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनात कवी महेश केळुसकर, योगिनी राऊळ, कल्पना मलये, सुनील कांबळे, राजेश कदम, मनीषा जाधव, तुषार मांडवकर, अभय शेवरे, स्नेहा कदम, प्रतीक पवार, प्रथमेश जाधव , चंद्रसेन जाधव, अनिल कांबळे, अशोक कांबळे , अनुराधा विभुते, साक्षी धावडेकर , दीपाली ठाकूर आदी.
सहभागी होणार आहेत. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी.प्रतिक पवार तर आभार प्रदर्शन प्रथमेश जाधव करणार आहेत.
या पारितोषिक वितरण सोहळ्यास आणि निमंत्रितांच्या कवी संमेलनास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सम्यक साहित्य संसदेचे मुंबईचे अध्यक्ष अभय शेवरे यांनी केले आहे.