जिल्हा स्काऊट- गाईड मेळाव्यात जि.प.पू. प्राथ.शाळा आंबेगाव नं.1चे उल्लेखनीय यश

सावंतवाडी,दि.९ फेब्रुवारी
बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे दि. 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्काऊट- गाईड,कब-बुलबुल मेळाव्यात सहभागी होत जि.प.पू. प्राथमिक शाळा आंबेगाव नं.1 ने सर्वाधिक 7 चषकांची कमाई करत उल्लेखनीय यश प्राप्त केले.
शाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकाने मातीकाम स्पर्धेत-प्रथम क्रमांक, गाठीच्या स्पर्धेत -प्रथम क्रमांक, शेकोटी कार्यक्रमात-तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या पथकात कु.ओंकार कुंभार,सदाशिव दळवी, रोहन झोरे, प्रणव दळवी, गणेश कोकरे,अजय जंगले,तनिश गावडे,भावार्थ झोरे, प्रविण जंगले,साईराज गावडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तसेच शाळेच्या शिवरत्न संभाजी कब पथकाने गाठीच्या स्पर्धेत-प्रथम क्रमांक, शेकोटी कार्यक्रम-द्वितीय क्रमांक, मातीकाम स्पर्धेत-तृतीय क्रमांक, बडी सलामी स्पर्धेत-तृतीय क्रमांक प्राप्त केला.या पथकामध्ये कु. समित कुंभार, विकास शेळके, नितेश जाधव, संग्राम मेस्त्री, गौरव गावडे,दीपराज झोरे, गौरव दळवी, पुष्कर कविटकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शाळेच्या या दोन्ही पथकांनी 7 चषकांची कमाई करत प्रशंसनीय यश प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे स्काऊट मास्टर श्री.नितीन सावंत,मुख्याध्यापिका श्रीम. अस्मिता मुननकर,श्री.प्रदीप म्हाडगुत,श्रीम.रसिका नाईक, श्रीम.स्नेहल कांबळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या जिल्हास्तरीय यशाबद्दल सावंतवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके, कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महादेव देसाई,आंबेगावचे सरपंच श्री. शिवाजी परब, उपसरपंच श्री.रमेश गावडे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अस्मिता मुननकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.साक्षी राऊळ, उपाध्यक्षा श्रीम. तेजस्वी गावडे, शिक्षण तज्ज्ञ श्री. राहुल राणे,श्रीम. रेखा गावडे,श्री.अशोक शिंदे, श्री.संतोष राणे तसेच सर्व पालक, सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
जि.प.पू. प्राथमिक शाळा आंबेगाव नं.1 ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्शवत शाळा असून ही शाळा सातत्याने विविध स्पर्धा तसेच उपक्रमांमध्ये सातत्याने यश संपादन करीत आहे.