सावंतवाडी,दि.९ फेब्रुवारी
माजगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – पक्षाच्या माध्यमातून खास महिलांसाठी ” खेळ पैठणीचा” व ”हळदी-कुंकू समारंभ” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांच्या हस्ते आणि सौ अनुराधा प्रवीण भाई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीतावर आधारित विविध खेळांचा आनंद देखील महिलांनी या वेळी लुटला. यातील विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात आली. यात प्रथमा क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या शितल सावंत, द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या प्रणिता सावंत, तृतीय क्रमांकाच्या मानकरी पार्वती सावंत तर लकी ड्रॉ विजेत्या ठरल्या शिवाली गावडे.
या प्रसंगी महिलांशी संवाद साधताना अर्चना घारे परब यांनी आपल्या संवादात स्त्री म्हणजे शक्ती. अपरिमित शक्ती. पण घरच्या दैनंदिन कामातच ही शक्ती व्यस्त राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून याच शक्तीच्या मुक्ततेसाठी, तिला स्वतःचा अवकाश मिळावा यासाठी खास महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ रंगला पैठणीचा समारंभ आयोजित केला होता असे सांगितले. तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या महिलांसोबत विविध खेळात सहभागी होता आला याचा आनंद आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी सायली दुभाषी, नीतिशा नाईक, सावली पाटकर, सुधा सावंत, श्रावणी कोरेगावकर, सुनिता भाई , पूजा दळवी, सिद्धी परब, आजी माझी माजगाव ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.