देवगड,दि.९ फेब्रुवारी
शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे त्यासाठी ग्रामपंचायत कडून करण्यात येणारी कार्यवाह अधिक परिणामकारक निर्दोष व नियोजनबद्ध व्हावी व जनतेला शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी कणकवली श्री अरूण चव्हाण यांनी केले .
जल जिवन मिशन अंतर्गत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण पंचायत समिती कणकवली सभागृहात गटविकास अधिकारी कणकवली अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . पुजा काळगे, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण , वैदयकिय अधिकारी डॉ . मोरेश्वर ढोके, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सुर्यकांत वारंग, विस्तार अधिकारी ग्रा.प . रामचंद्र शिंदे , अधिक्षक मनिषा देसाई , आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल ठाकुर ,पाणी गुणवत्ता सल्लागार नागेश तोरस्कर , अणुजैविक तज्ञ कणकवली लॅब रसिका पिळणकर , गटसमन्वयक नम्रता हरकुळकर , उपविभागीय तज्ञ निरज तांबे आदी मान्यवर उपस्थित होते .
पाणी गुणवत्ता सल्लागार नागेश तोरस्कर यांनी पिण्याचे पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण लाल कार्ड , पिवळे कार्ड , हिरवे कार्ड, चंदेरी कार्ड तसेच पाणी गुणवत्ता विषयक शासन निर्णय याबाबत मार्गदर्शक तर अणुजैविक तज्ञ रसिका पिळवणकर यांनी पाणी नमुने तपासणीचे माणके , रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहीम याबाबत मार्गदर्शन केले
या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , आरोग्य सहाय्यक , आरोग्य सेवक उपस्थित होते .
या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक विस्तार अधिकार सुर्यकांत वारंग तर आभार गटसमन्वयक नम्रता हरकुळकर यांनी मानले .
Home आपलं सिंधुदुर्ग शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक -गटविकास...