सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमध्ये स्मार्ट शाळा स्मार्ट ब्लॉक कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार

सावंतवाडी दि.९ फेब्रुवारी 

सावंतवाडी येथे होणाऱ्या ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन प्रसंगी दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमध्ये स्मार्ट शाळा स्मार्ट ब्लॉक कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याध्यापकांच्या हाती स्मार्ट टीव्ही सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी उपस्थित होते.
या शाळातील पाच हजार पेक्षा अधिक मुलांना या विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाचा थेट फायदा होणार आहे त्यामध्ये सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील शंभर दिवसांची यशस्वी अंमलबजावणीनंतर अध्ययन निष्पत्ती सुधारण्यासाठी हा कार्यक्रम इतर शाळांमध्ये विस्तारित केला जाणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
संपर्क फाउंडेशन ची स्थापना अनुपमा नायर आणि विनिन नायर यांनी २००५ मध्ये केली जे एस सी एल टेक्नॉलॉजी चे माजी उपाध्यक्ष आणि सीईओ होते विनीत नायर हार्वर्ड बिजनेस प्रेस बेस टेलर एम्प्लॉईज फर्स्ट कस्टमर सेकंडचे लेखक देखील आहेत .या विश्वासाने काटकसर येथील नवीन नवकल्पना आणि सरकार सोबतच्या भागीदारी त्यांची प्रभावी अंमलबजावणी शिकण्याच्या परिणामांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करू शकते फाउंडेशन या मार्गदर्शनाखाली डॉक्टर के राजेश्वर राव हे वरिष्ठ आयएएस अधिकारी यांनी आयोग गोल्ड च्या राष्ट्रीय आहे म्हणून विशेष सचिव म्हणून काम केले आहे अशा अनुभवी व्यक्तींचा सात यामध्ये लागली आहे संपर्क फाउंडेशनने उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड राजस्थान छत्तीसगड झारखंड आणि आता महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारची भागीदारी केली आहे आणि एक लाख शाळा मधील एक कोटी मुलांपर्यंत योजना पोहोचली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून संपर्क फाउंडेशन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्याशी संयुक्तपणे राज्यातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते सुधारणा करण्यासाठी काम करत आहेत.
संपर्क फाउंडेशन राज्याच्या निपुण महाराष्ट्र पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान कार्यक्रम अंतर्गत नियोजन उद्दिष्टे आणि निपुण भारत मिशनमध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी वचनबद्ध आहे या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सुमारे ६४ हजार मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळा चा टप्पा टप्पा ने समावेश केला जाणार असल्याचे संपर्क फाउंडेशनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविला जात असून त्यामध्ये सुमारे २६३० एलईडी स्मार्ट टीव्ही संपर्क टीव्ही ऑफलाइन सर्वांचीच सामग्री उपकरणे वितरित करण्यात आली आहेत तसेच चालू शैक्षणिक वर्षात या दहा जिल्ह्यात १५ हजार हून अधिक शिक्षकांना संपर्क स्मारक शाळा कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे निपुण महाराष्ट्र मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि राज्यातील प्रत्येक बालक पायाभूत गणित करू शकेल आणि सातच्या वेळी याची खात्री करण्यासाठी संपर्क फाउंडेशनने शालेय शिक्षण व क्रीडा विभागासोबत पाच वर्षाचा सामन जास्त करार केला आहे संपर्क फाउंडेशनने स्व निधीद्वारे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५ हजार स्मार्ट शाळेचे शाळांचे रूपांतर केले आहे आणि वार्षिक आर्थिक २०२४-२५ मध्ये आणखी पाच मार्क शाळा जोडण्याची योजना केली आहे शालेय शिक्षण मंत्री व मराठा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांची निवड केली आहे आता उद्या जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमध्ये स्मार्ट शाळा स्मार्ट ब्लॉक चा कार्यक्रम शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होईल अशी माहिती राजन पोकळे यांनी दिली यावेळी समन्वयक सचिन वालावलकर जिल्हाप्रमुख अशोक दळवी उपस्थित होते.