खिरापत वाटावी तसे आता “भारतरत्न” पुरस्कार (सर्वोच्च सन्मान) दिले जातात-डॉ जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी,दि.९ फेब्रुवारी
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करताना खिरापत वाटावी तसे आता “भारतरत्न” पुरस्कार (सर्वोच्च सन्मान) दिले जात आहेत.एकाच वेळी पाच व्यक्तींना पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे.असे सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर,माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी,माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि शेतीविषयक संशोधक विचारवंत एम एस स्वामिनाथन
अशा पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.पण
ज्यांच्या जाज्वल्य हिंदुत्ववादी विचारांचे राजकारण करून सत्ता मिळवली त्या वि दा सावरकरांना मात्र भारतरत्न जाहीर करण्यात आलेले नाही, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रा काढून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना भारतरत्न वाटप करताना सावरकरांचा विसर पडला आहे, असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.