प्रवासी कार्यकर्ता तथा तालुका उपाध्यक्ष सोनु सावंत यांनी लोकांशी साधला संवाद
कणकवली दि.१० फेब्रुवारी(भगवान लोके)
भारतीय जनता पक्षाचे गाव चलो अभियान अंतर्गत सातरल कासरल गावातील ग्रामस्थांशी व लाभार्थी भाजपा कार्यकर्त्यांनी संवाद साधत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत म्हणाले,केंद्र शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरीब कल्याणकारी आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ,आयुष्यमान भारत या योजना नागरिकांना दिलासादायक आहेत.
घर चलो अभियान अंतर्गत शासनाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणे ,गावातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत ग्रामसेवक, तलाठी , आशा सेविका व विविध योजना लाभार्थी संवाद कार्यक्रम झाला.
यावेळी कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष संतोष कानडे, प्रवासी कार्यकर्ता तथा तालुका उपाध्यक्ष सोनु सवांत ,बुध अध्यक्ष दिलीप तिरलोटकर , प्रदीप राणे , मनोज मांडवकर ,संकेत राणे ,सुशील राणे समीर राणे ,शरद दळवी ,प्रसाद सावंत , बाबू राणे , पंढरी परब , मनोहर भामले , कांत राणे ,महेश मेस्त्री आदी उपस्थित होते.