अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग तर्फे इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न

तळेरे,दि.१० फेब्रुवारी

दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्र तळेरे नं.१ या ठिकाणी केंद्र साळिस्ते व केंद्र कासार्डे या दोन केंद्रांची संयुक्त पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा अर्थात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती घेण्यात आली.
ही संघटना आंतरराष्ट्रीय शिक्षक संघटनाशी एक संलग्न असलेली बलाढ्य संघटना आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच झगडण्यासाठी आघाडीवर असते .शिक्षकांच्या हक्का बरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत जपणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज या संघटनेने शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित केली. गेली दहा वर्ष सातत्याने ही सराव परीक्षा ही संघटना घेत आहे. विशेष म्हणजे शासकीय परीक्षेचा दर्जा असलेले पेपर आज या परीक्षेत काढले जातात आणि प्रत्येक तालुक्यातून दहा टॉप टेन आणि जिल्ह्यातून दहा टॉप टेन असे जे विद्यार्थी येतात त्यांना दि स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग ॲवॉर्डने या सन्मानाने त्यांना सन्मानित केले जाते.
या उद्घाटन प्रसंगी कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यांनी या संघटनेच्या आदर्शवत उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच शाळा व्यवस्थापन समिती तळेरे नं.१ चे अध्यक्ष राजेश जाधव यांनी या संघटनेच्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्याचे जाहीर केले. .
त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती साळिस्ते नं.१ चे अध्यक्ष समीर ताम्हणकर म्हणाले, आपल्या या केंद्रातून निश्चितच टॉप टेन मध्ये आपल्या केंद्राचा विद्यार्थी असेल कारण शिक्षकांची मेहनत मी जवळून पाहिली आहे. याप्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेल अध्यक्षा संजना ठाकूर संघटनेच्या या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी अखिल संघ कणकवली उपाध्यक्ष सत्यवान केसरकर, वंशिका महाडेश्वर, सोनाली कुर्ले, स्नेहल जाधव ,मारुती मेस्त्री , शिक्षक भारती कणकवली अध्यक्ष श्रीराम विभूते, शाळा व्यवस्थापन समिती तळेरे नं.१ उपाध्यक्ष सौ.गोसावी, तळेरे नं. १ चे प्रभारी मुख्याध्यापक सौ.कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन जाकीर शेख यांनी केले तर शेवटी आभार सिताराम पारधिये यांनी मानले.