दोडामार्ग, दि. २ जानेवारी
गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील धोकादायक जयकर पाॅईंट उतारावर एका ठिकाणी संरक्षण कठडा रस्ता खचला आहे. हे कारण पुढे करून चाळीस वर्षे सुरू असलेली एस टी बस सेवा सात महिने बंद आहे. प्रवाशांची गैरसोय झाली आहे. पण अशा परिस्थितीत खाजगी वाहने सुरू आहेत. एस टी बस सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी संरक्षण कठडा दुरुस्ती कामाला सुरुवात करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता
या नंतर बांधकाम विभाग चंदगड कोल्हापूर यांनी टेंडर काढले. हे दुरुस्ती काम सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सुरू केले जाणार आहे. यासाठी तिलारी घाट सर्व वाहतूकीसाठी बंद ठेवला आहे. असे पञ बांधकाम विभाग चंदगड यांनी जाहीर केले आहे. दोडामार्ग चंदगड पोलिस याना कळवले आहे. तेव्हा वाहन धारकांनी तिलारी घाट मार्गे प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात तिलारी घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे या गोष्टी विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी २१ जून ते ३१ आॅक्टोबर पर्यंत सर्व अवजड वाहने यांना बंदी घातली होती. पण अवजड वाहने सुरू होती. पावसाळ्यात तिलारी घाटात जयकर पाॅईंट उतारावर रस्ता संरक्षण कठडा तुटला होता. जुलै मध्ये ही घटना घडली होती. या ठिकाणी बॅरल ठेवले होते.
तिलारी घाटातील अवजड वाहने बंदी उठवली पण एस टी बस सेवा सुरू झाली नव्हती तेव्हा रस्ता रोको आंदोलन उपोषण सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, कोदाळी सरपंच, इतर सामना कार्यकर्ते यांनी केले होते. या नंतर कोल्हापूर विभाग नियंत्रण यांनी घाटाची दोन वेळा पाहणी केली. पण संरक्षण कठडा दुरुस्ती झाल्याशिवाय एस टी बस सेवा सुरू केली जाणार आहे असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा २४ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या नंतर तातडीने टेंडर काढले. आणि सोमवारी तिलारी घाटातील संरक्षण कठडा दुरुस्ती कामाला सुरुवात केली जाणार आहे. हे काम धोकादायक ठिकाणी आहे. वाहतूक सुरू राहिली तर काम करता येणार नाही हे लक्षात घेऊन कामाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ३ फेब्रुवारी रोजी तिलारी घाट दुरुस्ती होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहानाना बंद असेल असे सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी कळविले आहे. आंबोली चोर्ला पर्यायी मार्ग वापर करावा असे आवाहन सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी केले आहे.