आचरा येथील तंत्र व कौशल्य विकास केंद्राचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन

रविवार ११ फेब्रूवारी रोजी दुपारी १ वाजता होणार संपन्न

आचरा,दि.१० फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
न्यू इंग्लिश स्कूल आचरा या विद्या संकूलात विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण मिळून विद्यार्थी स्वावलंबी बनावेत या हेतूने धी आचरा पीपल्स असोशिएशन मुंबईचे अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांच्या कल्पनेतून आणि आचरा गावचे सुपुत्र राजन गुळगुळे व कुटूंबिय यांच्या आर्थिक व तांत्रिक योगदानातून सुरु होत असलेल्या शिवराम उर्फ दाजी गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचरा चा उद्घाटन सोहळा रविवार ११फेब्रूवारी रोजी दुपारी १ वाजता केंद्रीय लघू सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे.
आचरा देवूळवाडीचे सुपुत्र
राजन गुळगुळे यांनी भारतातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयामधून पदवी ,पदव्युत्तर शिक्षण घेउन सिमेंन्स मध्ये भारतात आणि परदेशातही मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. कोरोना काळात आलेल्या विपत्ती मुळे अनेकांना आर्थिक विवंचनेचा त्रास सहन करावा लागला. भविष्यात नोकरया कमी होत आहेत. म्हणून शाळेतून शिक्षण घेउन बाहेर पडणारा विद्यार्थी स्वावलंबी बनवा यासाठी गुळगुळे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या भागातिल विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा ध्यास घेतला.
क्रमिक अभ्यास क्रमा सोबत तांत्रिक आणि कौशल्य आधारित अभ्यास क्रम शिकविल्यास विद्यार्थी स्वयंपूर्ण बनून स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करुन स्वावलंबी बनू शकतो या उदात्त भावनेने राजन गुळगुळे यांनी आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेत धी आचरा पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी यांच्या मार्गदर्शनानुसार स्वतः आर्थिक व तात्रिक योगदान देवून तंत्र विकास केंद्र चालू करत आहेत.तंत्र व कौशल्य विकास केंद्रा मार्फत यावर्षी पासून अभ्यास क्रम सुरु केला आहे. सदर अभ्यासक्रम
कौशल्य विकास केंद्र नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त आहे.या अभ्यास क्रमांतर्गत
इलेक्ट्रो-मेकॅनिकल ट्रेनर मध्ये
एअर कंडिशनर्स
रेफ्रिजरेटर्स
पंप-मोटर सेट
गॅसोलीन जनरेटर सेट
मिक्सर ग्राइंडर सेट
वाशिंग मशिन्स,इलेक्ट्रिकल मध्ये
घरगुती वायरिंग
औद्योगिक वायरिंग
मोटर ट्रान्सफॉर्मर वळण
इलेक्ट्रॉनिक्स मध्ये UPSमायक्रोवेव्हभ्रमणध्वनी
ऑटोमोबाइल मध्ये दुचाकी रिपेअर आदी बाबत सखोल सरावासहित शिकवले जाणार आहे.आपल्या भागातील मुलांना तंत्र कौशल्याचा फायदा व्हावा या हेतूने संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी यांचेही यासाठी अमुल्य योगदान लाभले.
अशा या नाविन्यपूर्ण विकास केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धी आचरा पीपल्स असोशिएशन मुंबई अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी व राजन गुळगुळे यांनी केले आहे.