खात्री करण्याकरिता केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी-तहसीलदार श्रीधर पाटील

सावंतवाडी ,दि.०३ जानेवारी 

शिधापत्रिका धारकांना जीवनाश्यक वस्तू सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांचा योग्य लाभ गरजू व्यक्तींना मिळावा यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य लाभ सुरू असलेल्या शिधापत्रिका सोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याची तसेच शिधापत्रिका मध्ये असलेल्या व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्याकरिता केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे याबाबतचे त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे
त्यात असे म्हटले आहे की
शिधापत्रीका, आधार कार्ड कागदपत्रांसह रेशन दुकानदारकडे जाऊन लाभार्थीं यांचा अंगठा पॉस मशीनवर ठेवावा लागेल, मशीनवर अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ओळख सत्यापित होईल आणि ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण होईलाई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुम्हाला शिधापत्रीकेवरील लाभ मिळू शकतील याची नोंद घेणे आवश्यक आहे.जे लाभार्थी कामाकरीता बाहेरगावी राहत आहेत त्यांनी त्यांचे नजीकचे रास्तभाव धान्य दुकानामध्ये भेट देऊन ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावे, जेणेकरुन कुणाचेही ई-केवायसी प्रक्रियो अपूर्ण राहणार नाही. असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.