देवगड प्रवासी कार्यकर्ता प्रियांका साळसकर, वैशाली तोडणकर यांनी नागरिकांशी साधला संवाद
देवगड,दि.१० फेब्रुवारी
देवगड शहरातील बुथ क्रमांक 61 आणि 62 मध्ये गाव चलो अभियान निमित्त योजनांची जनजागृती करण्यात आली.यावेळी प्रवासी कार्यकर्त्या प्रियंका साळसकर आणि वैशाली तोडणकर यांनी नागरिकांशी संवाद साधला .
यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर,बुथअध्यक्ष(६२)रवींद्र कोयंडे व बुध अध्यक्ष(६१)सचिन कदम,चारू सोमण,युवा मोर्चा शहरअध्यक्ष दया पाटील,तन्वी शिंदे, बबन मालंडकर, सौ मालंडकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
बचत गट महिला संवाद,आयुष्यमान भारत कार्ड वाटप,जेष्ठ कार्यकर्ता चर्चा, मागासवर्गीय वस्ती भेट,दिवार लेखन,शाळा,अंगणवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ याची भेट घेऊन संवाद साधून केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचून त्याची जनजागृती करण्यात आली.तसेच सरकारने केलेल्या कामांची पत्रक वाटप करण्यात आली. तसेच गावातील विकास कामांवर चर्चा करण्यात आली.