कधीही हाक मारा, मी तुमच्या सोबत : ना. नितेश राणे

कै. प्रवीण मांजरेकर कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

बांदा,दि.०३ जानेवारी  

प्रवीण मांजरेकर यांचे अकस्मात व अकाली जाणे हे अतिशय धक्कादायक आहे. तुम्हा कुटुंबीयांवर देखील तो मोठा आघात झाला आहे. तुमचं दुःख मी निश्चितच समजू शकतो. मात्र, दुःख आवरा, काळजी घ्या, कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिवंगत पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव तथा दै. तरुण भारतचे उपसंपादक कै. प्रवीण मांजरेकर यांच्या सातोसे येथील निवासस्थानी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी भेट देत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, जेष्ठ पत्रकार रवि गावडे, सचिन रेडकर, प्रवीण परब सातोसे उपसरपंच रुपेश साळगावकर, माजी सरपंच बबन सातोस्कर, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत धुरी आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.