सावंतवाडी दि.४ फेब्रुवारी
पर्यावरण आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मळगाव येथील लक्ष्मीनारायण नर्सरी व अँग्रोटुरीझम मार्गदर्शक ठरेल असा विश्वास युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला.
गणेश जयंती दिवशी अभियंता नाना कशाळीकर यांच्या मळगाव येथील प्रकल्पावर पितांबरी नर्सरीच्या फ्रेंचाईजीचे उद्घाटन झाले. नर्सरी बरोबर वृद्धांसाठी सर्वसोईनीयुक्त असे ऍग्रो टुरिझम व योगा पंचकर्म उद्योग देखील या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन युवराज लखन राजे भोसले यांच्या हस्ते झाले
यावेळी माजी फलोद्यान प्रमुख डॉ. गुंजाटे, ह हिरवळ या संस्थेच्या संस्थापिका डॉ. सौ प्रज्ञा चिटणीस, डॉ. माधव कशाळीकर ,सौ मृणालिनी कशाळीकर,नाना कशाळीकर, शर्व परांजपे, कैवल्य सिध्दये , अर्णव कलघटगी आदी उपस्थित होते
प्रास्ताविकात सौ मृणालिनी कशाळीकर यांनी माहिती दिली तर नाना कशाळीकर म्हणाले, आपण सन ८५ पर्यंत दोन हजार झाडे लावली त्यातील काहींना फलधारणा झाली नाही. त्यामुळे सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून नर्सरी सुरू करत आहोत.
यावेळी डॉ. प्रज्ञा चिटणीस यांनी प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला. माजी प्राचार्य डॉ. माधव कशाळीकर, डॉ. वामन कशाळीकर ,माजी प्राध्यापिका श्रीमती सुनिता कलघटगी, प्रसिद्ध साहित्यिक सौ मीना समुद्र, डॉ गुजांटे यांनी शुभेच्छा दिल्या.
याशिवाय रोटरीयन रमेश पई, सौ दर्शना रासम ,लेखिका श्रीमती कल्पना बांदेकर, सौ गायत्री अरविंद देशपांडे, पंचद्रवीड पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद सप्ते आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भक्ती परांजपे यांनी केले. नाना कशाळीकर यांच्या विविध प्रकल्पावर काम करत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी इंजिनीयर अद्वैत कशाळीकर यांनी आभार मानले.
Home आपलं सिंधुदुर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मळगाव येथील लक्ष्मीनारायण नर्सरी व अँग्रोटुरीझम मार्गदर्शक ठरेल-युवराज लखमराजे...