मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होण्याअगोदरच राजन तेली यांनी भूमिपूजन केले

सावंतवाडी दि.१० फेब्रुवारी 

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरण योजनेवर सुमारे ५६ कोटी रुपया खर्चाची सुधारित नळ पाणी योजना मंजूर असून या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना आणि भाजपामध्ये आज श्रेयवाद रंगला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार होते मात्र तत्पूर्वी माजी आमदार राजन तेली यांनी भूमिपूजन केले तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री हेच ऑनलाईन पद्धती तिने भूमिपूजन करणार असल्याचे म्हटले आहे.

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुधारित नळ पाणी योजनेचे ५६ कोटी रुपये मंजूर झाले असून यामध्ये शिवसेना आणि भाजपा मध्ये श्रेयवाद रंगला आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आपण आमदार असून योजना आपण योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी मंजुरीसाठी प्रयत्न केल्याचे माजी नगराध्यक्ष संजीव परब यांनी म्हटले आहे.
दरम्यान आज राजन तेली यांनी पाळणेकोंड येथे जाऊन प्रत्यक्ष भूमिपूजन केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने योजनेचे भूमिपूजन केले यावरून शिवसेना भाजपामध्ये आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
पाळणेकोडं धरण येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा नळपाणी योजनेचे भूमिपूजन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष श्री संजू परब,माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी,दिपाली भालेकर, समृध्दी विरनोडकर,भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधवळे,महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर,भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर,शहर सरचिटणीस विनोद सावंत,परिक्षीत मांजरेकर,महिला सरचिटणीस मेघना साळगावकर,सुकन्या टोपले,साक्षी गवस,चराठा उपसरपंच अमित परब,युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित रोणापाल उपसरपंच उदय देऊलकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.