तळवडे येथील गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव थाटात साजरा

असंख्य भाविकांनी घेतले श्री गणरायाचे दर्शन

 सावंतवाडी,दि.०४ फेब्रुवारी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिर 32व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 2025 रोजी करण्यात आले होते.

यावेळी श्री गणेश जयंती (विनायक चतुर्थी) मोठ्या थाटात साजरी व दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिराचा 32 वा वर्धापन दिन थाटात साजरा झाला.

यावेळी सकाळी अभिषेक व होम हवन व धार्मिक विधी, दुपारी 1 वाजता आरती, महाप्रसाद ,सायंकाळी 5 वाजता स्वर संध्या गायनाचा कार्यक्रम , पालखी सोहळा ,व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी असंख्य भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसाद याचा लाभ घेतला. श्री सिद्धिविनायक मंदिर तळवडे देवस्थानं आयोजक यांच्यामार्फत योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले होते. यावेळी या गणेश जयंती उत्सवानिमित्त असंख्य भाविकांनी श्री गणपतीचे दर्शन घेतले.