जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव

उद्योजक नंदकुमार घाटे यांनी घेतले श्रींचे दर्शन

देवगड,दि.०४ फेब्रुवारी 
जामसंडे येथील जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांनी श्रींचे दर्शन घेत विधीवत पूजा केली.या वेळी अध्यक्ष राजा भुजबळ ,सचिव चंद्रकांत पाटकर,सदस्य कमलाकांत भडसाळे, प्रसाद घाडी,विजय सडेकर,प्रदीप घाडी,प्रवीण जोग ,सुहास लाड,जामसंडे व्यापारी संघ अध्यक्ष राजू पाटील उपस्थित होते.या सोहळ्यानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती.