देवगड,दि.०४ फेब्रुवारी
रापम देवगड आगाराच्या अक्कलकोट देवगड या प्रवासी फेरीत सापडलेले प्रवाशांचे पाकीट देवगड आगार कार्यशाळा कर्मचारी यांनी प्रामाणिक पणे प्रवाशाला परत केल्याची घटना नुकतीच घडली या प्रामाणिक पणाबद्दल देवगड आगार कार्यशाळा कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
दि २ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट ते देवगड या बस मध्ये कोल्हापूर ते देवगड असा प्रवास करणारे प्रवासी . नितेश राजेंद्र संकपाळ यांचे पैसे व इतर महत्वाची कागदपत्रे असणारे पाकीट गहाळ झाले होते. सदर प्रवासी फेरी देवगड आगारात आली असता दैनिक करत कार्यशाळा कर्मचारी प्रसाद खडपकर व श्री. पवन फड यांना आढळून आले ही बाब देवगड आगार अधिकारी याचे निदर्शनास आणून त्या प्रवाश्यास संपर्क साधण्यात आला.व सदर पाकीट ओळख पटवून आतील रक्कम व कागदपत्र तपासून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.त्या प्रसंगी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, वाहन परिक्षक दिनकर प्रभुमिराशी, कार्यशाळा कर्मचारी पवन फड, प्रभाकर मिठबावकर आदी उपस्थित होते.