वेंगुर्ला ,दि.१० फेब्रुवारी
नवाबाग ग्रामस्थांतर्फे बायुला घुमटेश्वर मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि.१३ रोजी सिधुरत्न ढोलताशा पथकाच्या गजरात गणरायाचे आगमन, पूजन, दु.१२ वा. आरती व तीर्थप्रसाद, सायं.४ वा.लहान मुलांचे फनी गेम्स, सायं.६ वा. नवाबाग ग्रामस्थांची संगीत आरती, सायं. ७ वा. सिद्धेश्वर मंडळ, कोंडुरा (विवेक पेडणेकर) यांचे भजन, सायं.८ वा.लकी ड्राॅ कुपन स्पर्धा, रात्रौ ९.३० वा. वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित व फाळकर प्रस्तुत ‘अग्गंबाई सुनबाई‘ कार्यक्रम, दि.१४ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, स. ९ वा.नवाबाग ग्रामस्थांचे वारकरी भजन, दुपारी १२.३० वा.महाप्रसाद, दु. ३ वा.फुगडी व हळदीकुंकू, सायं. ६ वा. विसर्जन असे कार्यक्रम होणार असून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच फक्त १० रूपयांत भव्य लकी ड्राॅ कुपन स्पर्धा ठेवण्यात आली असून यातील आकर्षक भरघोस बक्षिसे जिकण्यासाठी यामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन नवाबाग ग्रामस्थांनी केले आहे.