वराडकर हायस्कुलमध्ये सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग व स्पर्धा संपन्न

मालवण,दि.४ फेब्रुवारी

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती ते जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी या कालावधीत सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग, सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमामध्ये स्पर्धेत सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारचे फायदे याबाबत प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर, क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर व भूषण गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ‌ॲड. एस एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, संस्था सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक एम. व्ही. भाट यांनी अभिनंदन करत शुभेच्छांचा दिल्या.