वेंगुर्ला ,दि.१० फेब्रुवारी
वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प भागातील खत गोदामानजिक असलेल्या संघाच्या मालकीच्या वरदविनायक मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व सायं. ७ वा. ओंकार नटेश्वर द.ना.मंडळ, कालेली यांचे दशावतारी नाटक होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. वरदविनायक मंदिराचे उर्वरित बांधकाम सुरू असून त्यासाठी कोणाला सहकार्य करावयाचे आहे त्यांनी संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी व प्रभारी व्यवस्थापक प्रदिप तेरेखोलकर यांच्याशी संफ साधावा.