सरकारने कितीही दबाव टाकला तरी मी निष्ठेने काम करत राहणार;कुठल्याही चौकशीसाठी मी तयार
कणकवली दि .४ फेब्रुवारी
गेल्या दोन तीन वर्षापासुन लाचलुचपत विभागाकडुन माझी चौकशी सुरु आहे. त्यांना लागलेली माहीती मी वेळोवेळी देत आहे. परंतु मी माझे प्रॉपर्टी पुर्णपणे दाखवली आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा दाखविले आहे. आजपर्यंत २० वर्षापासुन कागदपत्रे किती जणांकडे उपलब्ध असतील याची माहीती घेणे गरजेचे आहे. दबाव किती आला तरी आम्ही चुकीच्या पद्धतीने दबणार नाही. आम्ही निष्ठेने काम करतो. त्यामुळे मी आणि माझे कुटुंबिय कुठल्याही चौकशीला तयार आहोत. गद्दारांनी ऑपरेशन टायगर नाव ठेवण्यापेक्षा गद्दार ठेवण्याची गरज असल्याची टिका ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.
कणकवली येथे त्यांनी पत्नीला लाचलुचपत विभागाकडुन नोटीस आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
ज्यांनी पक्षासोबत गद्दारी केली तेच आता लोकांवर गद्दारी करण्याला भाग पाडतात. पुढे काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच. सर्वसामान्यांमध्ये तुम्हाला निवडुन दिले, नागरिकांचे आपण काम केले पाहीजे. आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणुन दुसऱ्यांना सुद्धा गद्दारी करण्याला प्रवृत्त करणे त्यामध्ये काय जनतेचे हित काय आहे? राज्यातील विविध विकास कामांपोटी ९६ हजार पेक्षा कोटीची देय रक्कम सरकार आहे. त्यांनी आ्ंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सर्व विकासाची कामे ठप्प आहेत. निवडणुकीत जी आश्वासने दिली होती. ती कशी पुर्ण करता येईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहीजे, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.