कामगार अधिकारी राजेश जाधव यांचेकडील अतिरिक्त कार्यभार करण्यात आला कमी
कणकवली दि .४ फेब्रुवारी
कामगार अधिकारी राजेश जाधव यांचेकडील अतिरिक्त कार्यभार कमी करण्यात आला आहे.तर आता कामगार अधिकारी कोल्हापूर वाय.ए. हुंबे यांच्याकडे सिंधुदुर्ग सरकारी कामगार अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्याबाबत शासन निर्णय आज काढण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांनी उपरोक्त अतिरिक्त कार्यभार आपल्या मूळ पदाचा कार्यभार व यापूर्वी सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यभारासह सांभाळावयाचा आहे. सदर आदेश तात्काळ अमलात येतील,असे शासन निर्णयात कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन श्रीनिवास जिरेवार यांनी म्हटले आहे.