वेंगुर्ला ,दि.१० फेब्रुवारी
गणेश जयंती निमित्त १३ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला-सुंदरभाटले येथे गणपतीची प्रतिष्ठापना, पूजन, आरती, १७ फेब्रुवारी रोजी श्रीसत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. सात दिवसांनी १९ फेब्रुवारी रोजी या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शन घ्यावे असे आवाहन श्री देव वांद्रेश्वर प्रासादिक कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे केले आहे.