महसूल विभागामार्फत चिरे ट्रक चालकांवर दंडात्मक कारवाई

फोंडाघाट,दि.१० फेब्रुवारी(संजय सावंत)
फोंडाघाट मार्गे पश्चिम महाराष्ट्र आणी कर्नाटक राज्यात वाहतूक नियम धाब्यावर बसवून राजरोस होत असलेली ओव्हरलोड चिरे वाहतूक याबाबत स्थानिक वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांची दखल घेत कणकवली तहसीदार दिक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत आज फोंडाघाट चेक पोस्ट याठिकाणी अचानक चिरे वाहतूक तपासणी करताना दोन ट्रक मालकानं वर पासापेक्षा जास्त चिरा वाहतूक होत असल्याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मागील कित्येक वर्षांपासून फोंडाघाट मार्गे ओवरलोड चिरा दगड वाहतूक राजरोस सुरु असून यामुळे फोंडाघाटा मध्ये तसेच देवगड निपाणी रोड वर अपघातांचे प्रमाण वाढलेले असून यामध्ये कित्येकाना आपला जीवही गमवावा लागला आहे. याबाबत स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या आल्या नंतर याची दखल घेत कणकवली तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडाघाट मंडल अधिकारी योजना सापळे, घोणसरी तलाठी नागेश लांबर, तलाठी तलाठी एन.एन.टाके,फोंडाघाट कोतवाल पांडुरंग राणे,घोणसरी कोतवाल यश म्हसकर यांच्या टीम ने आज फोंडाघाट चेक पोस्ट याठिकाणी जवळ पास 12 चिरे दगड ट्रकांची तपासणी केली असता यातील दोन ट्रकांन मध्ये पासा पेक्षा जास्त चिरा दगड आढळून आल्याने दोन्ही ट्रक मिळून सुमारे 28150/-रु चा दंड आकारण्या ची कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील सुधीर तेली,फोंडाघाट आउट पोस्ट चे पोलीस हवालदार सुधीर वंजारे,फोंडाघाट चेक पोस्ट वरील पोलीस प्रशांत कासले उपस्थित होते.
सिंधुदुर्ग वाहतूक नियंत्रण विभाग कारभाराचा भोंगळपणा उघड
दरम्यान आज महसूल विभागामार्फत चिरे ट्रक तपासणी वेळी तपासणी झालेल्या 12 ही चिरे ट्रकांमध्ये वजन क्षमतेपेक्षा जवळ पास 10 ते 15 टन ओव्हरलोड चिरे आढळून आले तसेच कोणत्याही ट्रका बरोबर क्लिनर ही नव्हते मात्र ओव्हरलोड चिरे वाहतूक कारवाई महसूल विभागा च्या अख्त्यारीत येत नसून या वर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलीस किंवा सिंधुदुर्ग वाहतूक नियंत्रण विभागाला असल्याचे कारण पुढे करत ओव्हरलोड चिरा ट्रकांना सोडून देण्यात आले.यावरून आज सिंधुदुर्ग वाहतूक नियंत्रण विभागाचा कसा भोगळ कारभार सुरु आहे हे उघड झाले.
दरम्यान यावेळी तेथे उपस्थित ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग वाहतूक नियंत्रण विभागाच्या अशा गलथान कारभाराबाबत नाराजगी व्यक्त करताना या अशा ओव्हरलोड चिरे वाहतुकीवर कारवाई कधी करणार आणि या अशा ट्रक चालकांना सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाचा धाक राहणार की नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला