मणेरी पुलावर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक तिघे गंभीर जखमी उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले

दोडामार्ग, दि. ५ फेब्रुवारी 

दोडामार्ग ते बांदा मार्गावर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मणेरी पुलावर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने झालेल्या या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याना तातडीने दोडामार्ग रूग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे मणेरी पुलावर दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडली. होती दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून वाहने बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. नशीब बलवत्तर दुचाकी चालक सह प्रवासी नदी पाञात पडले नाही. या अपघात प्रकरणी दोडामार्ग पोलीस तपास करत आहेत.
मणेरी पुलावर एम. एच. ०७
ए. एन. ७९६८ जुपीटर स्कुटर. एम. एच. ०७ ए. सी. ०४२४ होंडा मोटार सायकल दरम्यान पुलावर समोरासमोर जोरदार धडक बसली. दोन्ही दुचाकी दूर दूर फेकल्या जाऊन झालेल्या या अपघातात संदेश सोनू जंगले वय वर्षे ३५ सासोली , जखमी झाला. संदीप श्रीकांत सावंत, कुडाळ वय वर्षे ४० सुरज अनंत धोंड, वय वर्षे २६ रा. शिरशिंगे हे तिन्ही गंभीर जखमी झाले. मणेरी सासोली येथील स्थानिकानी त्यांना तातडीने दोडामार्ग रूग्णालयात १०८ बोलावून दखल केले.
जखमी एकावर खाली उतरणे शक्य नसल्याने रुग्णवाहिका मध्ये प्राथमिक उपचार केले. तर दोन जणांवर ग्रामीण रुग्णालय येथे डाॅक्टर आरोग्य सेविका कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार केले. संदीप सावंत यांच्या सोबत कुणी नव्हते काही युवकांनी त्यांच्या नातेवाईक यांचे नंबर घेऊन जखमी बाबत माहिती दिली. आणि बांबोळी गोवा येथे येण्यास सांगितले.
मणेरी पुलावर दोन दुचाकी अपघात झाला वाहने थांबली हे समजताच पोलीस व्ही. जी. सावंत, पोलीस बाबी देसाई, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दुचाकी वाहने बाजूला केली. घटनास्थळी चपले मोबाईल कव्हर इतर साहित्य विस्कळीत पडले होते. तर तीन ठिकाणी रक्त सांडलेले होते. पोलिसांनी पंचनामा करून नंतर दोडामार्ग रूग्णालयात येऊन माहिती घेतली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास व्ही जी. सावंत, बाबी देसाई करत आहेत. दोन्ही दुचाकी वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली.