कणकवली दि.१० फेब्रुवारी (भगवान लोके)
कलमठचे ग्रामदैवत श्री देव काशीकलेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या प्रथम वर्धापन दिनामिमित्त मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई
लक्षवेधी ठरत आहे. ही विद्युत रोषणाई अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडिवर शेअर देखील केले आहेत. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळत आहे. या व्हिडिओमुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या कलमठवासीयांना श्री देव कलेश्वर मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई अन् श्री देव काशीकलेश्वराच्या पिंडीवर केलेली अारास ऑनलाईनद्वारे पाहाता येत आहे.
श्री देव काशीकलेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार व शनिवार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार सकाळच्या सत्रात धार्मिक विधी पार पडले. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री देव काशीकलेश्वराच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रिघ लागली होती. सायंकाळाच्या सत्रात महिला व पुरुष भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. रात्री सत्रात कलमठ गोसावाडीतील गोरक्षणाथ मित्रमंडळाने ‘अाले देवाजीच्या मना’ ही विनोदी नाटिका सादर उपस्थितांना हसविले. त्यानंतर कलमठ-खालची कुंभारवाडीने ‘कालचक्र’ ही नाटिका सादर करून चार युगांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.