देवगड,दि.१० फेब्रुवारी
जामसंडे सन्मित्र मंडळ जामसंडे सार्वजनिक माघी गणेशोत्सव १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जामसंडे सार्वजनिक माघी गणेशोत्सव जामसंडे बाजार पेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी ते सायंकाळी ४ वा. श्रींचे आगमन जामसंडे हायस्कूल लेझीम पथक ढोल पथकांसह मंगळवार दिनांक १३फेब्रुवारी सकाळी ९.३० वा. प्रतिष्ठापना स. ११.३० वा. श्रीची आरती, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने व आरती बुधवार दि. १४ फेब्रुवारी स.११.३० वा. ची आरती सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, आरती, सायं.४ वा. गणपती अथर्वशीर्ष सहस्त्र आवर्तन, रात्री९ वा. राजू चव्हाण मिमिक्री व खेळ पैठणीचा, गुरुवार दि. १५ फेब्रु. स.११.३० वा.श्रीची आरती सायं. ७ वाजता स्थानिक भजनी, आरती रात्री ९ वा. एकांकिका ,शुक्रवार दि.१६ फेब्रु. स. ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ११वा. आरती दुपारी ११.३० वाजता पासून तीर्थप्रसाद दुपारी ३ ते ५ पर्यंत हळदीकुंकू समारंभ सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने व आरती रात्री ९ वाजता विविध गुणदर्शन शनिवारी १७ फेब्रुवारी सकाळी ११ वा. श्रीची आरती सायंकाळी ४ वा. आरती सायंकाळी ५ वा. श्रींचे विसर्जन मिरवणूक, याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या माघी गणेश जयंती उत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष कमलाकांत भडसाळे ,सन्मित्र मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ ,उपाध्यक्ष शरद ठुकरूल विजय सडेकर, प्रशांत वारिक, कार्यवाह चंद्रकांत पाटकर यांनी केले आहे.