अज्ञानाच्या बेड्या तोडून विज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानशी एकरूप होऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची गरज-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

सावंतवाडी दि.१० फेब्रुवारी
विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी. अज्ञानाच्या बेड्या तोडून विज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानशी एकरूप होऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. विज्ञानाची कास धरताना चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाला महत्त्व दिले असून संशोधन आणि संध्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे. त्यातून जीवनाच्या वाटचालीत प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
येथील बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी सावंतवाडी नगरपरिषद पाणीपुरवठा योजना आणि माजगाव धरण योजना प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन केंद्र यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल राज्य विज्ञान शिक्षण संस्था अशा विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकांवे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन भरले आहे त्याच्या ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी माजगाव येथील २४ कोटी खर्चाची धरण योजना आणि सावंतवाडी नगरपरिषद पाळणे कण ५६ कोटी सुधारित नळ योजना चे ऑनलाईन भूमिपूजन केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले
यावेळी आभासी पद्धतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली तसेच शिक्षण संचालक राहुल रेखावार, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे, भोसले नॉलेज सिटी चे अच्युत सावंत भोसले, कल्याणकुमार पाटील ,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक ,तहसीलदार श्रीधर पाटील, संचालक शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालेकर ,विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे ,संचालक डॉ राधा अतकरी, शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे, राजेंद्र निंबाळकर, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य सचिन वालावलकर, डॉ. अर्चना सावंत, केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे, गणेश प्रसाद गवस, बाबू कुडतडकर, अँड नीता कविटकर, अन्नपुर्णा कोरगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
ऑनलाईन बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्रालय स्वीकारल्यानंतर या दोन्ही विभागांमध्ये आवश्यक ते योग्य बदल घडून आणले आहेत ते नवनवीन शैक्षणिक प्रयोग करून विद्यार्थी आणि शिक्षकांत लोकप्रियता मिळवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देखील त्यांनी केली असून वैज्ञानिक प्रदर्शन सावंतवाडी येथे भरवून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यांला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे ही काळाची गरज आहे त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण मिळावे म्हणून घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी देखील होत असून मुलांच्या शाळेतील वेळा देखील ते निश्चित करत आहेत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी देखील त्यांनी प्राधान्य केले असून शेती विषय अभ्यासक्रमात घ्यावा म्हणून प्राधान्य दिले आहे देशातील पहिले सरकार महाराष्ट्र सरकार असून त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेत खर्च घालून मदत देण्याचा प्रयत्न केला आहे वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथालय चळवळ देखील सुरू करण्याचा मनोदय असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण विभाग मराठी भाषा मंत्रालयामध्ये नवनवीन प्रयोग सातत्याने घडून आणले आहेत शासकीय शाळा स्पर्धेच्या युगात मागे राहू नये विद्यार्थी पुढे जावे म्हणून ते प्रयत्न करत आहेत जर्मनी बरोबर त्यांनी करार केला असून चार लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
महाराष्ट्र सरकार वेगवान आणि प्रगतशील सरकार असून शिक्षण आरोग्य कृषी पर्यावरण पर्यटन आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहेत स्किल डेव्हलपमेंट साठी देखील प्रयत्न करत असून मुंबई कोकण असा ग्रीनफिल्ड महामार्ग देखील बनवण्याचा निर्णय घेतला आहे सावंतवाडी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शहरांच्या सर्वांगीण विकास पाणीपुरवठा योजना स्वच्छता याकडे भर दिला असून शहरांमध्ये ऑक्सिजन निर्माण होण्यासाठी देखील प्रयत्न चालविले आहेत असे त्यांनी सांगितले माजगाव धरण योजनेचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले माजगाव धरण योजना ह्या जलसंधारण आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त असून मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडवणीस यांनी जलयुक्त शिवार योजना देखील राबवली होती ती योजना वेगाने राबवली जात आहे जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अशा योजना देखील राबवल्या जात असून महामार्ग आणि सागरी किनाऱ्यावर देखील विकासासाठी प्रयत्न चालविले आहेत असे त्यांनी सांगितले कोकणाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महाले सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर आहे तो वैज्ञानिक दृष्ट्या देखील प्रगतीपथावर व्हावा म्हणून आमचा प्रयत्न चालू असून शैक्षणिक पॉलिसी ही राज्यात नेण्याचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरीची हमी मिळावी असे मत व्यक्त केले आहे नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेत शिक्षण दिले जात असून अभियंता शिक्षण मराठी दिले असून ४० टक्के विद्यार्थ्यांचा त्या सहभाग आहेत शिक्षण घेत असताना प्रत्येक देशाला स्वतःची भाषा महत्त्वाची वाटते त्यामुळे स्वतःच्या भाषेत प्रत्येक देशांनी शिक्षण दिले असल्याने तेथे प्रगती झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्यावसायिक शिक्षण भाषेमध्ये दिले जावे म्हणून निर्णय घेतला आहे तो त्या निर्णयाच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येत आहे जर्मनीमध्ये चार लाख विद्यार्थ्यांना नोकरी आणि कौशल्य विकास धरतीवर शिक्षण मिळणार आहे तो करार जर्मनी सरकारशी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी केसरकर म्हणाले हिंदुस्तान कार्पोरेशन- टाटा कंपनीमध्ये सुमारे २५ हजार नोकऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे वैभव जगपातीवर नेण्यासाठी प्रयत्न करावा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून हे या ठिकाणी घेण्यात आले आहे शालेय शिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभागामार्फत राज्यात मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल करून प्रगती साधण्यात आली आहे तीस हजार शिक्षक भरती देखील करण्यात येत असून कला व क्रीडा शिक्षक हा केंद्रनिहाय देण्याचा विचार आहे प्रत्येक स्कूलमध्ये सेलिब्रिटी स्कूल राबवण्याचा विचार आहेत विद्यार्थी कोणत्याही गोष्टी कमी पडलं पडू नये म्हणून शैक्षणिक दृष्ट्या विविध प्रगती साधली जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवले आहे त्याप्रमाणेच मुलांची प्रगती साधावी म्हणून आमचे प्रयत्न असल्याचे केसरकर यांनी सांगितले
यावेळी आभासी पद्धतीने बोलताना सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, सावंतवाडी नळ पाणी योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न आम्ही प्रयत्न केला सावंतवाडीचा विकास झपाट्याने व्हावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न आहेत सावंतवाडी शहराचे पाणीपुरवठा योजना महत्त्वाची असून माजी नगराध्यक्ष संजू परब व सर्व नगरसेवकांनी त्यासाठी पाठपुरावा केला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दीपक केसरकर यांच्याही यासाठी हातभार लागला असून दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे योजना मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून पाण्याची योजना भूमिपूजन सोहळ्यास शुभेच्छा त्यांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्वजण एकत्रितपणे प्रत्येक प्रकल्प आणि योजना मंजूर आणि पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी प्रास्ताविकात डॉ. संध्या अतकारी यांनी तर संचालक राहुल रेखावार यांनी माहिती दिली यावेळी यशस्वी आयोजन बाबतीत भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .मंत्री दीपक कसरकर यांचा राहुल रेखावार यांनी सत्कार केला तसेच भोसले नॉलेज सिटी च्या वतीने देखील सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांना संपर्क फाऊंडेशन माध्यमातून स्मार्ट टीव्ही मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.