ग्रामसंवाद उपक्रम सहभागी व्हा – दयानंद चव्हाण

कुडाळ,दि.६ फेब्रुवारी 

ग्रामसंवाद उपक्रम कुडाळ पोलीस स्टेशनकडून राबविला जात असून यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन कुडाळ पोलीस स्थानकाचे बिट हवालदार दयानंद चव्हाण यांनी आज, गुरुवारी ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी उपसरपंच प्रदीप गावडे,
पोलीस पाटील दिपाली कुबल, साजुराम नाईक, श्रीकृष्ण भोसले, तलाठी अर्दकर, पोस्टमास्तर प्रणव पाटील, शिक्षक शंकर गोसावी,समृद्धी कदम ,विद्यार्थी वर्ग, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी दयानंद चव्हाण म्हणाले की, आजच्या काळात सायबर क्राईम, मुलांवरील अत्याचार हे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याबाबत नागरिकांना माहिती असूनही गुन्हे घडतात. महिला आणि लहान मुलांवर अत्याचार होतात. याची माहिती आपणास असते. पण आपण कायदा हातात घेतो. आज स्त्रियांची सुरक्षा महत्वाची आहे. प्रत्येक नागरिकाने स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल जागरूक हवे.
तर पॉस्कोसारखा कायदा मुलांसाठी आहे. अल्पवयीन मुलींच्या छेडछाड काढल्यास शासनाने पोस्को कायदा आहे. याबाबत जनजागृती व्हावी. पण या कायद्याचा गैरवापर सुद्धा वाढला आहे. आज पोलिस प्रशासनाला कोणतीही तक्रार आल्यास घ्यावी लागते. त्याचा तपास करून मग गुन्हे दाखल होतो. याची माहिती आजच्या नागरिकांना आवश्यक आहे.
तसेच आज सायबर क्राईम किंवा ऑनलाईन फ्रॉड यांचे प्रमाण वाढले आहेत. आपण पाहिले तर जेष्ठ नागरिकांना फसविले जात नाही, उलट आजची सुशिक्षित नागरिक यांची फसवणुकीची शिकार होते.

डायल ११२ हा नंबर महत्वाचा
डायल ११२ हा नंबर प्रशासनाकडून
देण्यात आला आहे. नागरिकांनी येता-जाता संशयित वाटल्यास या नंबर कॉल करा. पोलीस अधिकारी आपल्या सेवेसाठी तत्काळ उपस्थित राहतील, असे मार्गदर्शन दयानंद चव्हाण यांनी केले.

चेन स्नॅचींग प्रमाण वाढले
मागील काही वर्षात मंगळसूत्र चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्त्रियांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.