सांस्कृतिक वारसा आणि मालवणी खाद्यपदार्थाचा आस्वाद
कुडाळ,दि.०७ फेब्रुवारी
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर विस्ताराची योजना आखलेल्या ‘सरोवर हॉटेल्स’ने ‘हायलंड कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने ‘हायलंड सरोवर पोर्टिको’ या सिंधुदुर्गस्थित नव्या हॉटेलची घोषणा केली आहे. कोकणाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे हॉटेल अप्रतिम समुद्रकिनारे, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि प्रसिद्ध मालवणी खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी शांततेचा आणि आरामदायी विश्रांतीचा आनंद देते. चिपी विमानतळापासून अवघ्या १२ किलोमीटर आणि कुडाळ रेल्वे स्थानकापासून २० किलोमीटर अंतरावर वसलेले वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा श्रीरामवाडीमधील ही व्यवस्था पर्यटकांसाठी अतिशय सोयीस्कर असून स्थानिक संस्कृतीशी नाते जोडणारा अनुभव देणारी आहे.
आराम आणि स्थानिक वैशिष्ट्यांचा सुरेख मिलाफ साधणाऱ्या या हॉटेलमध्ये सजविलेल्या ५० खोल्या उपलब्ध आहेत. ‘डिलक्स रूम्स विथ बाल्कनी’ आणि ‘प्रीमियम रूम्स विथ बाल्कनी’ असे रुम्सचे दोन प्रकार असून, प्रत्येक रूममधून निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचा विहंगम आनंद घेता येतो. ‘फ्लेवर्स’ हे हॉटेलमधील ‘ऑल डे’ डायनिंग रेस्टॉरंट पर्यटकांना पारंपरिक मालवणी पदार्थ आणि ताज्या समुद्री खाद्यपदार्थांचा स्वाद चाखण्याची संधी देते. याशिवाय स्विमिंग पूल आणि वेलनेस सेवा आदी विश्रांतीच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून आम्ही आमच्या ग्राहकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘सरोवर हॉटेल्स’चे चेअरमन आणि ‘लूवर हॉटेल्स इंडिया’चे संचालक अजय के. बकाया म्हणाले, ‘हायलंड कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने सिंधुदुर्ग येथे हायलंड सरोवर पोर्टिको सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. कोकण हे वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ असून येथील हॉटेलच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना उच्चस्तरीय सेवा आणि सुविधा देण्यासाठी सज्ज झालो आहोत. सुंदर निसर्ग, स्थानिक संस्कृतीचे दर्शन आणि अतिथींसाठी आत्मीयतापूर्ण सेवा यांमुळे आम्ही एक अविस्मरणीय अनुभव देऊ इच्छितो.’
‘हायलंड कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक देवदास नाईक यांनी सांगितले, की ‘सिंधुदुर्गमध्ये मोठी पर्यटन क्षमता आहे आणि सरोवर हॉटेल्सच्या सहकार्याने आम्ही या प्रदेशातील आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध आहोत. हायलंड सरोवर पोर्टिको हे कोकणाच्या अद्वितीय सौंदर्यात भर घालणारे आणि प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा, सेवा आणि स्थानिक अनुभव देईल. हे हॉटेल पर्यटकांसाठी एक आवडते ठिकाण बनेल, याचा आम्हाला विश्वास वाटतो.’