एसटी कामगार सेनेच्या तालुकाप्रमुखपदी वैभव मालंडकर यांची निवड

कणकवली दि.१० फेब्रुवारी(भगवान लोके)

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेच्या कणकवली तालुकाप्रमुखपदी वैभव मालंडकर याची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र विभागीय सचिव भगवान धुरी व सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी मालंडकर यांना दिले.

यावेळी राम एडके, संजय गावडे, आबा सावंत, बंड्या कोरगावकर, मिलिंद नाईक, सचिन सावंत, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत व राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या आदेशानुसार मालंडकर याची कणकवली तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नाईक व धुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एसटी कामगार सेनेच्या सभासदवाढी आणि कामगारांवरील अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी योग्य काम करेन, अशी प्रतिक्रिया वैभव मालंडकर यांनी दिली.