मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

मालवण,दि.१० फेब्रुवारी

शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती उत्सव साजरा होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे..

यानिमित्त दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर ते मालवण बंदर जेटी शिवज्योत आगमन, सायंकाळी ४ वाजता दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शोभयात्रेला प्रारंभ होणार आहे. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य सिंहासनी मूर्ती, मुंबईतील सुप्रसिद्ध ढोलताशा पथक, मालवणी सुपरहिट रोंबाट, वेशभूषा स्पर्धा, रथ यात्रा, मावळे, घोडे व हत्ती, फटक्यांची आतषबाजी असे खास आकर्षण राहणार आहे. तसेच सायंकाळी ७.३० वा. बक्षीस वितरण व रात्री ८ वा. महाराष्ट्रातील ११० कलाकारांचा सहभाग असलेले सुपासिद्ध ‘शिवबा’ नाटक सादर होणार आहे. तरी शिवप्रेमींनी या शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.