कोनाळकट्टा कालवा सांडवा पुलाजवळ उभ्या कारला धडक वाहनांचे नुकसान सुदैवाने कुणी जखमी नाही

दोडामार्ग, दि. १० फेब्रुवारी 

गोवा दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव मार्गावर शनिवारी सकाळी तिलारी धरणाच्या कोनाळकट्टा कालवा सांडव्याच्या पुलाजवळ एक ओमीनी कार उभी करून चालक खाली उतरला असता सांगली येथून गोवा येथे जाणाऱ्या कारची मागून धडक बसून ओमीनी कार जवळपास दहा फूट पुढे जाऊन झाडाच्या वेलीला अडकून राहिली. शनिवारी सकाळी पाऊणे नऊ
वाजता हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले.