मालवण,दि.०९ फेब्रुवारी
साहित्यिक, कवी व्हायच असेल तर साहित्याच्या प्रवासात नुसता प्रवास न करता निसर्ग वाचला पाहिजे, प्रवासातील सहप्रवासी वाचता आला पाहिजे , निसर्गातील सर्व घटनांकडे डोळस पणे पाहता आल पाहिजे म्हणजे कवितेचे विषय आपोआप मनात वृंजी घालायला लागतात आणि कवितेचा जन्म होतो.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी श्री विजय जोशी उर्फ विज्यो यांनी मसुरे येथे बोलताना केले
मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल येथे कवी श्री विजय जोशी उर्फ विज्यो यांचा ” संवाद कवितेशी, संवाद विद्यार्थ्यांशी” हा कार्यक्रम पार पडला यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, लोकल कमिटी अध्यक्ष श्री. राजन परब, श्री. प्रदीप भोगले, मुख्याध्यापिका सौ.अर्चना कोदे , सांस्कृतिक समिती अध्यक्ष सौ. वर्षाराणी अभ्यंकर आदी उपस्थित होते
यावेळी श्री विजय जोशी यांनी बहारदार कविता सादर करतानाच वृत्तबद्ध कविता लेखनासाठीचे मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक विद्यार्थी, काव्यप्रेमी ग्रामस्थ, भरतगड हायस्कूल नंबर दोन चे माजी विद्यार्थी ,श्री विजय जोशी यांचे वर्गमित्र तसेच भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, वेरली प्राथमिक शाळा, देऊळवाडा नंबर दोन तसेच केंद्र शाळा मसुरे, भरतगड हायस्कूल नंबर दोन इत्यादी शशशाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते
भरतगड हायस्कूल नंबर २ चे माजी शाळा समिती अध्यक्ष श्री विठ्ठल यांनी खुमासदारपणे घेतलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून विजय जोशी प्रगट होत गेले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.अर्चना कोदे यांनी केले तर कवीचा परिचय सौ सोनाली तळाशीलकर यांनी करून दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भरत ठाकूर सर यांनी केले.