कुडाळ,दि.०९ फेब्रुवारी
श्री देव भैरव जोगेश्वरी मित्रमंडळ, कुडाळ आयोजित रक्तदान शिबिर आज भैरव मंदिर येथे आयोजित करण्यात आले.
या शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. सदर रक्तदान शिबिर मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय राऊळ, उपाध्यक्ष शरद मेस्त्री, खजिनदार राजू महाडिक, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेविका नयना मांजरेकर, रामदास राऊळ, बाळा राऊळ, दिलीप महाडिक व उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, मित्रमंळाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थित सुरु करण्यात आले.
मित्रमंडळातर्फे रक्तदात्यांचे तसेच शिबिरात सहकार्य करणाऱ्या उत्सव मंडळाचे व मित्रपरिवारंचे आभार मानले. या रक्तदान शिबिरास नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेवक राजीव कुडाळकर, अमित सामंत, जितेंद्र सावंत, नगरसेवक मंदार शिरसाट, व्यापारी मंदार शिरसाट, चेतन पडते, बाजारपेठ मित्रमंडळ
राकेश कांदे, अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, संजय भोगटे, राजन नाईक
आदी मान्यवर व्यक्तींनी भेट दिली. यावेळी रक्तदात्यांना चहा, बिस्किट आणि पोहे हा अल्पोपहार देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांनी दात्याची तपासणी करून नंतर रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच जिल्हा रक्तपेढीचे मंडळातर्फे आभार मानण्यात आले.