कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट अभियंता म्हणून अजयकुमार सर्वगोड यांचा गौरव;गतिमान आणि पारदर्शकरित्या कामगिरी बजावल्या बद्दल गौरव…
कणकवली दि.१० फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट अभियंता म्हणुन अजयकुमार सर्वगोड यांचा गौरव करण्यात आला.यावेळी गेल्या वर्षभरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात गतिमान आणि पारदर्शकरित्या काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.यावेळी न्यायधीश टी.एस.एच.शेख, न्या.एम.बी.सोनटक्के हस्ते उत्कृष्ट अभियंता म्हणून माझा झालेल्या सन्मानाने मी भारावलो, अशी बोलकी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
कणकवली तालुका दिवाणी न्यायालयात कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी कणकवली तालुक्याचे न्यायधीश टी.एस.एच.शेख, न्या.एम.बी.सोनटक्के , ॲड. उमेश सावंत, ॲड.राजू परुळेकर,ॲड.विलास परब, ॲड .अनिल बर्वे ,ॲड.विलास परब
आदींसह बार असोसिएशनच्या पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अजयकुमार सर्वगोड म्हणाले, माझ्या जीवनात सार्वजनिक बांधकाम मध्ये प्रथम राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनानिमित्त येणार होते, आणि त्यासाठी राजकोट किल्ला उभारण्याची जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत घेतली. त्यामुळेच ते यशस्वी काम करू शकलो.आता या राजकोट किल्ल्याकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यांमधून लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. हे आपल्या जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी फार महत्त्वाचे आहे.माझा उत्कृष्ट अभियंता म्हणुन आणि गतिमान, पारदर्शकरित्या काम करणारा अभियंता आपण सन्मानित केला.त्याबद्दल मनस्वी आंनद होत आहे. म्हणुनच आनंदाने मला आवर्जुन उल्लेख करावा वाटतो ते म्हणजे,”अरे विध्यात्या अजुन काय हवे आहे मला..!”.
यावेळी ॲड. उमेश सावंत म्हणाले,एखाद्या अधिकाऱ्याची कार्यतत्परता कशी असावी, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड .त्यांनी राजकोट किल्ला बांधताना घेतलेली मेहनत ही कौतुकास्पद आहे.त्यानंतर गेल्या महिन्या काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता लक्षणीय काम आहे. त्याचे श्रेय सर्वगोड यांना जात आहे. त्यामुळेच हा बार असोसिएशनच्या वतीने हा सन्मान करण्यात आलेला आहे.
यावेळी ॲड.विलास परब यांनी मार्गदर्शन केले.