दोडामार्ग,दि.१० फेब्रुवारी
दोडामार्ग चंदगड तालुका सीमेवर वसलेल्या शिवकालीन पारगड किल्ला येथील श्री देवी भवानी मंदिरात माघ म्हाही ( जञौत्सव) उत्सव निमित्ताने ११ फेब्रुवारी व १२ फेब्रुवारी रोजी भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पारगड किल्ला वासिय ग्रामस्थ यांनी केले आहे.
११ फेब्रुवारी रोजी
सकाळी १० वा. : श्री. भगवती देवी लघुरुद्राभिषेक. पुरोहितः संजय मणेरिकर यजमानः सौ व श्री. श्यामसुंदर अर्जुन तांबे दुपारी १२ वा.: महाआरती
रात्रौ ९ वा.: अॅड. श्री शिवाजी यशवंतराव देसाई (गोवा) यांचे, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान”रात्रौ १२ वा. : महाप्रसाद.
उत्तर रात्रौ २ वा.: भगवती देवीचा गोंधळ.
बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ ग्वद्धः वी महादेव मंदिर किले पारगड.
सकाळी १० वा. : श्री. महादेव मंदिर द्वितीय वर्धापन दिन समारंभ. दुपारी १२ वा. : महाप्रसाद.
महाप्रसादाचे मानकरी : श्री. अमृत महादेव शेलार
बुधवार दि १२ फेब्रुवारी २०२५ स्थळ: श्री भवानी मंदिर किले पारगड
सायंकाळी ७ : ३० वा. महाप्रसाद.
महाप्रसाद मानकरी : श्री. हेमंत राजमाने (मुंबई), श्री. शिवाजी शंकर बोर्ड श्री. वैभव मुरलीधर गडकरी, कु. प्रितम जयवंत मालुसरे
बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ स्थळ: श्री भवानी मंदिर किले पारगड
रात्री ९ वा. : पोवाडे, लोकगीत व बतावणी यातुन इतिहास व वर्तमान यांची सांगड घालणारा रांगडा मराठमोळा कार्यक्रम
शाहीर रंगराव पाटील (कोल्हापुर)” प्रस्तुत शिवशाही ते लोकशाही
निर्मीती : शाहीर रंगराव पाटील (कोल्हापुर) व कवी : शाहीर युवराज पाटील
रात्रौ १०:३० वा.: श्री भवानी नाट्यमंडळ किल्ले पारगड (मुंबई) प्रस्तुत सामाजिक व कौटुंबिक नाट्य पुष्प,
माहेरची पुण्याई
लेखकः दशस्थ राणे
दिग्दर्शक : शशिकांत कृष्णा शिंदे
कलाकारः नितीन घुमे, शशांक आडाव, संदेश चव्हाण, यश डांगे, निलेश नांगरे, महेश मालुसरे, शशिकांत शिंदे, ईशा माळकर
रंगमंच व रंगभुषा : गुरुप्रसाद नाट्यवस्तु भंडार, कासारपाल (गोवा)
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.