माजी पंचायत समिती सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
सावंतवाडी दि.११ फेब्रुवारी
कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त यांच्या संयुक्त विद्यमाने व कलंबिस्त हायस्कूलच्या सहभागातून आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात जवळपास २०० रुग्णांनी लाभ घेतला या महाआरोग्य शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड १५ जणांनी त्याचाच लाभ घेतला या शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाचा तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.
या शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले ते म्हणाले, कलंबिस्त गावातील लोकांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे काम गावातील दुग्ध संस्था आणि ग्रामपंचायत एकत्र येऊन करत आहे असे कार्य खरंच महान आहे गावच्या सर्वांगीण विकासाला आरोग्य सुदृढता हे एक महत्त्वाचे आहे अशी शिबिराच्या माध्यमातून एक सामाजिक विकास साधला जात आहे असे गौरव उद्गार काढले
कलंबिस्त हायस्कूलमध्ये हे महाआरोग्य शिबिर घेण्यात संस्थेच्या सातवावर्धापन दिनाच्या वतीच्या साधून घेण्यातआले या शिबिराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन श्री राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सपना सावंत जिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिगंबर करंबळेकर, डॉ. श्याम राणे ,दुग्ध संस्थेचे चेअरमन अँड संतोष सावंत, सचिव रमेश सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, हनुमान पास्ते, दर्शना बिडये ,सुप्रिया राऊळ, रिया सावंत, मेघा तावडे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, संस्थेचे संचालक दत्ताराम कदम, गजानन राऊळ, माजी सैनिक प्रकाश सावंत, शाहू पास्ते, श्री बाळा घाडी, बाळा राजगे, लवू राऊळ, यशवंत सावंत, शिक्षक शरद सावंत ,सौ कविटकर, किशोर वालावलकर ,रवी कमल सावंत, रवींद्र तावडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. श्याम राणे म्हणाले, नागरिकांच्या तपासण्या करणे हे सोपे आहे परंतु त्या तपासण्या केल्यानंतर त्यावर उपचार होणे आवश्यक आहेत आणि कायमस्वरूपी उपचार करण्याच्या दृष्टीने कलंबिस्त गावातील दुग्ध संस्था तुमच्या पाठीशी आहे.
यावेळी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अँड संतोष सावंत यांनी स्पष्ट केले दुग्ध संस्थेचे हे सातवे वर्ष आहे सातवा वर्धापन दिनानिमित्त गावातील लोकांची आरोग्य तपासणी केली गेली आहे ग्रामपंचायत च्या सहकार्याने हे शिबिर घेतले गेले आहे सामाजिक भावनेतून कार्य करताना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पशुसंवर्धनामध्येही एक विकासात्मक काम केले जाईल याचबरोबर महिलांना स्वयंरोजगार आणि त्यातून एक वेगळी क्रांती घडवण्याच्या दृष्टीने आमची संस्था नेहमी कार्यरत आहे सर्व शेतकऱ्यांच्य सहभागामुळेच ही संस्था उभारी घेत आहे ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी जो काही सहभाग असेल तो केला जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित डॉक्टर व नर्स कर्मचारी डॉ. दिगंबर करंबळेकर ,डॉ. शाम राणे, नर्स श्रद्धा सावंत, चेतन कोरे ,केतन कदम ,स्वाती रावले, संदीप मोहाड, संगीता कोरे, संतोष देसाई, तृप्ती जाधव, नेहा पडते, प्रियांका राऊळ, प्रशांत जाधव ,दशरथ गोसावी ,सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या रक्तपेढीतील श्री लिंगवत आदींचा गौरव संचालक दत्ताराम कदम स्वप्नील सावंत सिद्धेश सावंत आदींच्या हस्ते करण्यात आला सुत्रसंचलन तेजश्री सावंत यांनी केले.
यावेळी आभार मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते