स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर स्मृती दीना निमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन

सावंतवाडी दि.११ फेब्रुवारी
नेमळे शिक्षण संस्थेमार्फत व श्री देवी सातेरी ग्रंथालय व सास्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचा वतीने प्रतीवर्षी देशभक्त स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर स्मृती दीना निमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते सोमवार दि २६ फेब्रु रोजी सकाळी ११ वा नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ई. आठवी ते नववी तील विद्यार्थ्यांसाठी असून स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर यांच्या व्यक्ती मत्वाचे विविध पैलू या विषया संदर्भात सहा मिनिटे भाषण करावयाचे आहे प्रत्येक शाळेने आपल्या दोन निवडक विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठवावे या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेली नाही प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांला १ हजार रुपये तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार द्वितीय क्रमांकास ,७०० रुपये तृतीय क्रमांकास ५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे नेमळे विद्यालयाच्या प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी जाहीर केले आहे