कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)
अमर सेवा मंडळ आयनल मणेरवाडी व मुंबई यांच्या वतीने आयनल मणेरवाडी गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माघी गणेश जयंती उत्सव निमित्त मंगळवार, १३ रोजी सकाळी ५ वा. काकड आरती, ८ वा. अभिषेक, ९ ते ११ वा. महाआरती व तीर्थप्रसाद, १२ ते ३ वा. महाप्रसाद वाटप, सायंकाळी ७ वा.स्थानिक ‘भजन, रात्री १० वा. श्री माऊली स्थापेश्वर दशावतार नाट्य मंडळ(डेगवे) यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमास गणेश भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमर सेवा मंडळ आयनल मणेरवाडी व मुंबई यांच्या वतीने अध्यक्ष भगवान मसुरकर, उपाध्यक्ष नारायण फाटक,सचिव आदेश आ. ओटवकर,खजिनदार विलास ना. हडकर यांनी केले आहे.